राष्ट्रवादीच्या ‘युवक जोडो व संपर्क अभियानाची’ चोपडा येथे दणक्यात सुरुवात

0

चोपडा.प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त १० जूनला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभरातील युवक जास्तीत जास्त युवा वर्ग पक्षाशी जोडण्यासाठी व या युवाशक्तीचा वापर सुदृढ समाजउभारणी करण्याकरिता व्हावा या अनुषंगाने जिल्हाभर संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. २२ वर्षाच्या काळात पक्षाची स्थापना झाल्यानंतर पुढचे १५ वर्षे सलग सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेसाठी घेतलेले समाजोपयोगी निर्णय तसेच आदरणीय पवारसाहेब केंद्रीय मंत्री असताना त्यांचे कृषी, शिक्षण, विज्ञान, आरोग्य, कला,क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील त्यांचं बहुमूल्य योगदान तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावं हा एकमेव उद्देश घेऊन हे अभियान राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे.

जामनेर येथून या अभियानाची सुरुवात झाली तर त्यानंतर यावल, रावेर व आज चोपडा येथे या अभियानाची आढावा व नियोजन बैठक संपन्न होऊन चोपडा तालुक्यात सुरुवात करण्यात आली. महिला मंडळ ह्या शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते आदरणीय मा.अरुणभाई गुजराथी उपस्थित होते. अरुणभाईंनीच या बैठकीसाठी पुढाकार घेत तालुक्यातून जास्तीत जास्त युवक कसे या बैठकीला उपस्थित राहतील याची दक्षता घेतलेली होती. व संपूर्ण योजनाबद्ध नियोजन केलेलं होतं. ज्याचा परिणाम म्हणजे आजची चोपडा तालुक्याची बैठक ही विक्रमी स्वरूपात यशस्वी झाली…

यावेळी अध्यक्षीय भाषणात अरुणभाईंनी जेव्हा मोठ्या प्रमाणात त्या पक्षात युवकांचा सक्रिय सहभाग असतो, तेव्हाच त्या पक्षाला चांगले दिवस येत असल्याचं मत मांडत आजची तरुणाई ज्या वेगाने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपलं म्हणणं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकते व त्याचा दीर्घकालीन फायदा पक्षाला होत असल्याचंही मत मांडलं. गावोगावी, खेड्यापाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूतरित्या पायाभरणी करायची असल्यास ग्राउंड लेव्हलवर प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेबांनी मांडलेली ‘वन बूथ, टेन युथ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जाण्याची आवश्यकता असल्याचंही ते आपल्या भाषणात म्हणाले. म्हणूनच शहर तसेच तालुका युवक कार्यकारिणीतर्फे लवकरात लवकर बूथ कमिट्या तयार करून गांभीर्याने पक्षवाढीसाठी प्रयत्न गरजेचं असल्याचं ते म्हणाले. यानंतर जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र नाना पाटील यांनीही पक्षात जे युवक जमिनीवर उतरून योगदान देतील, प्रामाणिकपणे पक्षासाठी झटतील अशाच युवा कार्यकर्त्याना पक्षातर्फे आगामी काळात संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं. यासाठी आदरणीय पवार साहेबांचे पुरोगामी विचार तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी यावेळी मांडलं.

याप्रसंगी, जिल्हाध्यक्ष मा.भैय्यासाहेब रवींद्र पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन मा.चंद्रहासभाई गुजराथी, जि.प.सदस्या सौ.नीलम पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.विजयाताई पाटील यांनीही मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.दीपक पाटील, तालुकाध्यक्ष मा.राजेंद्र पाटील, युवक तालुकाध्यक्ष मा.मनोज पाटील, युवक शहराध्यक्ष मा.समाधान माळी, मा.जि.प.अध्यक्ष मा.गोरखतात्या पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे व्हा.चेअरमन मा.प्रवीणभाई गुजराथी, चो.सा.का चेअरमन मा.अतुल ठाकरे, कृ.उ.बा.चे सभापती मा.कांतीलाल पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष मा.दुर्गादास पाटील, पं.स.उपसभापती मा.सूर्यकांत खैरनार, पं.स.माजी सभापती सौ.कल्पनाताई पाटील, पं.स.सदस्य तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.भारती बोरसे, मार्केट कमिटीचे माजी सभापती मा.गिरीश पाटील, पं.स.माजी सभापती मा.भरत पाटील,  पं.स.माजी सभापती मा.विनायक पाटील, रा.काँ. सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मा.निलेश बोदडे,  रा.यु.काँ. जिल्हा उपाध्यक्ष सनी सचदेव, रा.यु.काँ जिल्हा सरचिटणीस मा.प्रफुल्ल स्वामी, युवक शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सरपंच दत्ता साबळे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते बांधव उपस्थित होते….

Leave A Reply

Your email address will not be published.