राष्ट्रपती राजवटची महाराष्ट्रात गरज नाही

0

मुंबई :  भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काल राज्यपालांकडे केली होती.   याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या  सामना मधून नारायण राणे  यांच्यावर निशाणा साधत ‘राजभवनातील तोफा (गंजलेल्या)’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

भाजप नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड टीका करण्यात आली आहे.  राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेमध्ये जाऊन करण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही’ अशा शब्दात शिवसेनेनं भाजपला सणसणीत टोला   सामनाच्या अग्रलेखात  लगावला आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख ?

राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही. दोनेक वर्षांपूर्वी मुंबईच्या राजभवनाखाली एक ब्रिटिशकालीन भुयार सापडले. त्यात काही जुन्या गंजलेल्या तोफा वगैरे सापडल्याचे तेव्हा सांगितले गेले. महाराष्ट्रातील सरकार पडणार असे आवाज त्या गंजलेल्या तोफांतून काढावेत असे मनसुबे कोणी रचू नयेत. जुन्या तोफा म्हणजे हवा-पाण्याची नळकांडीच ठरतात. राजभवनातील हवा-पाणी गढूळ होणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.