रामगड येथे महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू : अकस्मात मृत्यूची नोंद

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी  

तालुक्यातील रामगड येथील एक 24 वर्षीय महिला विहिरीत बुडून मयत झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील राम गड येथील गुलाब गुमान भिलाले वय 65 वर्षे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की , काल 14 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खबर देणाऱ्याची  विवाहिता मुलगी सीता सुमेरसिंग भिलाले (वय 24 वर्षे)  (राहणार  रामगड तालुका मुक्ताईनगर) ही शौचास जाते असे सांगून घरातून निघून गेली. परंतु ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिनांक 15 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील करकी येथील विनोद दत्तू पाटील यांच्या शेतातील विहिरीत सदर महिलेचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या वडिलांच्या खबरी वरून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान , विहिरीत बुडून सदर महिलेचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांच्यासह पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनीही भेट दिली. व नातेवाईकांची चौकशी केली. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार हे स्वतः करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.