राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

0

जळगाव : एन दिवाळीत ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. अवकाळी पावसाचे ढगाळ वातावरण कायम असून येत्या रविवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. किमान तापमानात झालेली वाढ हळूहळू कमी होऊन रविवारपर्यंत १७ अंशांपर्यंत येवू शकते. त्यामुळे वातावरणातील थंडीचा गारवा काहीसा परत येईल.

गेल्या आठवड्यात किमान तापमान १० अंशावर गेल्याने थंडीचा कडाका वाढला हाेता; मात्र त्यात ढगाळ वातावरणामुळे एकाच दिवसात १० अंशाने वाढ झाल्याने एेन दिवाळीत थंडी गायब झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान २० अंशावर तर कमाल तापमान ३५ अंशावर असल्याने वातावरणात उकाडा जाणवत अाहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ नाेव्हेंबरपर्यंत किमान तापमान १७ अंशांपर्यंत खाली येईल; परंतु याच कालवाधीमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता कायम अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.