राजमाता अहिल्यादेवींचा एकेरी उल्लेख करणार्‍या कलर्स मराठी टी.व्ही.वर कठोर कारवाई करावी

0

अमळनेर (प्रतिनिधी):- अतुल परचुरे यांनी ‘कलर्स मराठी’ टी.व्ही. वर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संपूर्ण धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून कायद्यानुसार अतुल परचुरे आणि ‘कलर्स मराठी’ टीव्ही चॅनेल यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी व ‘कलर्स मराठी’ टीव्हीचे प्रक्षेपण लायसन्स रद्द करावे अशी आग्रही मागणी मौर्य क्रांती संघ आणि सकल धनगर समाज प्रतिष्ठान अमळनेर यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली असून उभय नेत्यांना पाठवावयाचे निवेदन अमळनेरचे तहसिलदार श्री. मिलींद वाघ साहेब यांना देण्यात आले.

यावेळी तहसिलदार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात व निवेदनावर स्वाक्षरीचा समावेश असलेल्यांमध्ये सकल धनगर समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीलाल अण्णा भागवत, सचिव एस.सी. तेले , प्रा. डी. व्ही. भलकार, समाधानभाऊ धनगर, प्रभाकर नाना लांडगे, प्रा.जी. एल. धनगर, सकल धनगर समाज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीन आबा निळे, खजिनदार प्रदीप दादा कंखरे, मच्छिंद्रआबा लांडगे, तुषारभाऊ धनगर, आनंदा धनगर सर आदींचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.