‘या’ सहा राज्यातून जळगावात येणाऱ्या प्रवाशांची करणार कोरोना चाचणी

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने धडक पाऊल उचलले आहे.  केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली व उत्तराखंड या संवेदनशील राज्यांमधून रेल्वेने जळगाव जिल्ह्यात आलेल्या सर्व प्रवाशांची रॅपीड अॅन्टिजेन चाचणी करावी. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांना काेविड केअर संेटरमध्ये दाखल करावे. तर निगेटिव्ह असलेल्या नागरिकांना १४ दिवस हाेम क्वारंटाइन करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

संवेदनशील राज्यांमधून जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, रावेर या रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन माहिती रेल्वे विभागाने नियुक्त केलेल्या नाेड अधिकारी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना कळवावी. तसेच रेल्वे स्थानकांवर सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग व रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट करण्यासाठी मनपा क्षेत्रात आरोग्य अधिकाऱ्यानी तालुक्याच्या ठिकाणी मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी २४ तास स्वतंत्र कक्ष स्थापन करावे, असे अादेश दिले अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.