यावल शहरात आढळले प्लास्टिक अंडे ; अन्न व औषध प्रशासन निष्क्रिय

0

तालुक्यात भेसळ युक्त खाद्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

यावल ( सुरेश पाटील ) – यावल शहरासह तालुक्यात ठिक-ठिकाणी भेसळ युक्त खाद्य पदार्थ थंड पेय अप्रमाणित आरोग्यास घातक असे अनेक वस्तू थंड पाण्याचे जार पाण्याच्या काही पॅक बाटल्या, पाणी पाऊच, बारीक दळलेले मसाले, हळद व् मिरची पावडर, लोणचे सर्रास खुलेआम विक्री होत आहे. यावल शहरात आज सकाळी एका हॉटेल मालकाने नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून आवाज उठवून प्लास्टिक अंडे यावल शहरात असल्याचा स्पष्ट पुरावा दिला. यामुळे अन्न व औषध प्रशासन किती निष्क्रिय आहे हे उघड झाले आहे.

यावल शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी अंडे विक्री करणारे अंडा सेंटर आहेत, बँकांचे एटीएम मशीन जशे ठिकाणी झाले आहेत त्याप्रमाणे बिअर बार परमिट रूम मध्ये हॉटेल खानावळ हातगाड्यांवर इत्यादी ठिकाणी आम्लेट, अंडा भुर्जी, अंडा करी तयार करून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. एका हॉटेल चालकाने शहरातून एका प्रख्यात अंडा विक्रेत्याकडून नेहमीप्रमाणे अंडे खरेदी केले. अंडे ऊकळल्यानंतर काही चार ते पाच अंडी रबराच्या चेंडूप्रमाणे प्लास्टिक मुक्त आढळून आले, हॉटेल चालक गप्प न बसता जनजागृती व्हावी म्हणून त्याने प्रथम ”दैनिक लोकशाही” प्रतिनिधी सुरेश पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून आरोग्यास घातक असे प्लास्टिक युक्त उकळलेले अंडे चा पुरावा दाखविला व आरोग्य हिताच्या दृष्टीने जनजागृती होण्यासाठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

हा झाला प्लास्टिक अंडे चा विषय व पुरावा याचप्रमाणे यावल आठवडे बाजारात व शहरात हाथ गाड्यांवरून मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, बारीक केलेला मसाला, ओला मसाला, तयार केलेले लोणचे प्लास्टिक च्या बाटलीमध्ये भरून खुलेआम ओरडून ओरडून विक्री होत आहे. शहरात तालुक्यात तर काही दुकानांमध्ये वस्तूची व् खाद्यपदार्थ वस्तूची मुदत संपल्यावर सुद्धा सर्रासपणे विक्री होत आहे पॅकिंग केलेल्या वस्तूवर वस्तू पॅकिंगची दिनांक व एक्सपायर डेट किंमत एकाच ठिकाणी न देता त्या वस्तूवर कोणाला लवकर दिसणार नाही अशा प्रकारे नोंद केलेली असते.

याचप्रमाणे शहरात तालुक्यात थंड पाण्याचे जार, थंड पाण्याच्या बाटल्या ,पाण्याचे पाऊच व अनधिकृत पॅकिंग केलेल्या रंगीबेरंगी थंडपेय बाटल्या, लस्सी ,आईस्क्रीम, कोण चोकोबार इत्यादी अनेक खाद्यपदार्थ थंडपेय विक्री होत आहे. काही दुकानदार प्रख्यात कंपन्यांचे खाद्यपदार्थ थंडपेय विक्री करतात परंतु काही संधीसाधू आपल्या गल्लीबोळात सर्व परवानग्या बाटलीत बंद करून सोयीनुसार पॅकिंग करून आरोग्यास घातक हानिकारक अशा वस्तू सर्रासपणे विक्री करीत आहे.

बेकायदा अनधिकृत खाद्यपदार्थ व थंडपेय विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करीत नसल्याने या बेकायदेशीर व्यवहारात व आरोग्यास हानिकारक व्यवसायातून फार मोठे वार्षिक हप्ते सुरू असल्याचे व्यापारी वर्तुळात नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

तरी अन्न व औषध प्रशासनाने एक खास भरारी पथक नियुक्त करून अनधिकृत,भेसळयुक्त वस्तू व खाद्यपदार्थ थंड पेय विक्रेत्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी तसेच यावल शहरात प्लास्टिक अंडे विक्री करणाऱ्यावर कड़क कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.