यावल तालुक्यातील १४ हजारच्यावर विधवा, निराधार व अपंग नागरिकांना मिळणार प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान

0

यावल (प्रतिनिधी) : राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या वेगाने वाढत्या प्रादुर्भावचा टाळण्यासाठी १५ते ३० एप्रील पर्यंत राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरीकांनी आपल्या घरातच रहावे सुरक्षीत रहावे

या दृष्टीकोणातुन संचारबंदी लावण्यात आली असुन दरम्यान या पन्द्रादिवसाच्या कालावधीत अपंग , निराधार नागरीकांना आपली उपजिवीका भागविण्यासाठी आर्थीक अडचणींना सामोरे जावु नये या करीता राज्यातील महा विकास आघाडी शासनाने तालुक्यातील संजय निराधार योजनेचे ३९०४लाभार्थी , वृद्धपकाळ योजनेचे ५ हजार२८५ लाभार्थी , श्रावणबाळ वृद्धपकाळ योजनेचे ४ हजार३३७लाभार्थी , इंदीरा गांधी निराधार योजनेचे १३६६ लाभार्थी व इंदीरा गांधी अपंग योजनेचे ७१लाभार्थी असे एकुण १४ हजार९०६ लाभार्थ्यांना सुमारे दोन कोटी ५० लाख रुपये हे येत्या आठ दिवसाच्या आत प्रत्यकाच्या बॅंकेतील खात्यात दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असुन , शासनाच्या वतीने या संकटकाळातील मिळणाऱ्या मदतीचे निराधार व अपंग, विधवा महिला व नागरीकांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.