यावल आगारातुन बससेवा बंद असल्याने नागरिक विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल

0

यावल ( प्रतिनिधी ) येथील एसटी आगारातुन लॉक डाऊन जाहीर झाल्यापासुन आज पर्यंत ग्रामीण परिसरात बससेवा पुर्णपणे बंद करण्यात आल्याने ग्रामीण जनतेचे गावाकडुन शहराकडे येण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन प्रभारी आगार व्यवस्थापकांनी तात्काळयाची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे .
दरम्यान मागील आठ महिन्यापासुन संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता शासनाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने संपुर्ण राज्यात बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता . पण मागील दोन महीन्या पासुन जळगाव जिल्ह्मासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली असुन सर्वत्र एसटी बस सेवा ही पुर्वरत करण्यात आली असतांना यावल आगाराच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रातील जवळपास सर्व बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असल्याने ग्रामीण परिसरात राहणारा शेतकरी , विद्यार्थी व सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असुन , बससेवा पुर्णपणे बंद असल्याने नागरीकांना पर्यायी व्यवस्था म्हणजे इतर खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनाने जास्त पैसे देवुन प्रवास करावा लागत असल्याने यावल एसटी आगाराच्या या दुर्लक्षीत कारभाराचा त्रास ग्रामीण नागरीकांना होत असल्याने महामंडळाने तात्काळ ग्रामीण क्षेत्रातील बससेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.