म्हणून गिरीश महाजनांना आता ‘ईडी’ची आठवण येतेय; एकनाथ खडसे

0

जळगाव : भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय महिला रुग्णालयाच्या पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवर ‘ईडी’ची तारीख आल्यावरच त्यांना कोरोना कसा होतो? असा टोला लगावला होता.

दरम्यान, गिरीश महाजनांनी लगावलेल्या टोल्यावर एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता गेल्याने गिरीश महाजनांना झटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आता ‘ईडी’ची आठवण येवू लागली आहे. ‘ईडी’ तुम्हीच लावता, दुसरे कोण लावणारे आहे. आणि तुम्हीच ‘ईडी’ लावून छळ करता हे जगाला माहिती आहे, असं खडसे म्हणाले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, की गेले विस दिवसापासून कोरोना झाल्यामुळे मी बाँम्बे हाॅस्पीटमध्ये कोरोनाचा उपचार घेत होतो. मला खुप त्रास झाला आणि मला जाणीव आहे कोरोनामध्ये किती त्रास होतो. त्यामुळे मला काही नौटंकी करण्याची सवय नाही, असेही खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.