मुरबाड पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची नवीन युक्ती; घरफोडी चोरांना बसणार आळा (व्हिडीओ)

0

मुरबाड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुरबाड तालुक्यात नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी मुरबाड शहरकरांसाठी ऐन सणासुदीच्या दिवसांत व कोरोना  विषाणू महामारीच्या प्रादुर्भाव मध्ये मुरबाड शहरामध्ये घरफोडी व चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी आपल्या मुरबाड पोलीस स्टेशन मधील टीमला  सोबत घेऊन एक नामी शक्कल लढविण्यात आली आहे.

फेसबुक लिंक 

रात्रीच्या सुमारास दोन पेट्रोलिंगच्या गाड्या मुरबाड शहराकरिता फिरता पहारा देणार आहेत.  जेणेकरून मुरबाड शहरामध्ये घरफोड्या होणार नाहीत, याकरिता ही नामी युक्ती पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी लढविली असून हे केल्याने मुरबाड शहरामध्ये चोरीचे प्रमाण व घरफोडीचे प्रमाण कमी होईल. हे धोरण मुरबाड शहराकरिता लागू करण्यात आले आहे अशी माहिती मुरबाड पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.