मुक्ताईनगरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली आढावा बैठक

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या उपाय योजने संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर येथे विविध विभागांच्या प्रमुखांसह आढावा बैठक घेऊन लॉक डाऊन च्या काळातील सर्व शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले, तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर योगेश राणे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे ,गट विकास अधिकारी सुभाष मावळे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, गटनेते राजेंद्र हिवराळे,नगरसेवक संतोष मराठे,वसंत भल भले हे प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी अनिल देशमुख यांनी संपूर्ण तालुक्याचा तहसीलदार शाम वाडकर यांच्याकडून आढावा घेतला.याप्रसंगी तहसीलदार वाडकर यांनी शहरात दोन ठिकाणी प्रत्येकी 40 बेड कोविळ सेंटर उभारण्याची माहिती दिली. प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोग्य विभागासाठी पीपी ई किट तत्काळ उपलब्ध करून देण्याची तसेच होमगार्ड ची देखील मागणी तालुक्याच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून केली.याप्रसंगी गृहमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना तत्काळ होमगार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले तसेच संबंधित होमगार्ड यांचे वेतन देखील अदा करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे त्यांना आदेश दिले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी मलकापूर येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या मन्यारखेडा येथील नागरिकांन संदर्भातील अहवाल सादर केला.त्यावेळी सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम कोरून टाईन करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. या बैठकीत मुक्ताईनगर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी या सर्वांच्या कोरोना संदर्भात लढाईमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक गृहमंत्र्यांनी केले.आढावा बैठकीनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यातील अंतुर्ली व कुऱ्हा या दोन ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती संदर्भात निवेदन गृहमंत्र्यांना दिले.दोन्ही गावे तालुक्यातील मोठी गावे असून याठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण देखील जास्त असल्याने स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.