मुंबई येथून हरवलेला प्रिन्स ची पाच दिवसानंतर झाली मातेशी भेट

0

वर्दीतील माणुसकीचे दर्शन : सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराचे फलित

पहूर प्रतिनिधी

मुंबई येथून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बालकाला रविवार रोजी त्याची आई भेटली. आई आणि चिमुकल्याची प्रत्यक्ष भेट होतांना पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर आपल्या हातून आई व हरवलेल्या चिमुकल्याची भेट घडवून आणली या चांगल्या कामाबद्दल पहूर पोलिसांचा आनंद वेगळाच होता. आपल्या हरवलेल्या मुलाची माहिती मिळताच मुंबई येथून बाळाच्या आईने पहूर पोलीस स्टेशन येथे हजेरी लावली.
दोन वर्षीय बालकाला मुंबई येथून चोरून आणून पहूर येथील शिवनगर भागात राहणार्‍या इसमास पाचोरा रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या चिमुकल्याच्या आई – वाडिलांचा शोध लागलेला असून तो चिमुकला वाशी येथील असल्याचे चौकशीतून समोर आले आहे .पहूर पोलीसांनी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून चिमुकल्याच्या आई – वडिलांचा शोध घेत माणूसकीचे दर्शन घडविले आहे .
पहूर येथे शिवनगर वस्तीत राहणार्‍या एका इसमाकडे कोणीतरी लहान मूल असल्याच्या माहीती वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी , सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी चौकशी करून मुल ताब्यात घेतले . संबधीत इसमास हे मूल पाचोरा रेल्वे स्थानकावर बेवारस असल्याचे आढळून आल्याने त्याने आपल्या घरी आणले . सदर मुलाचा फोटो आणि संपर्क क्रमांक व्हॉट्स अ‍ॅप गृप, फेसबुक वर व्हायरल झाल्यामुळे अवघ्या दोन तासात बालकाच्या आईचा शोध घेणे शक्य झाले .रविवार रोजी सकाळी ठाणे येथील रहिवासी शालू (सोनू )करण शिंदे वय 19 या सकाळीच पहूर पोलीस स्टेशन येथे हजर झाल्या. यावेळी आई आपला मुलगा प्रिन्स ला पाहण्यासाठी आतुर झाली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी,सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, पोलीस शिपाई राखी जाधव, यांनी प्रिन्स ला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. आई आणि मुलगा प्रिन्स यांची भेट होतांना पाहून उपस्थित पहूर पोलीस स्टेशन चे अधिकारी यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले. आपला मुलगा प्रिन्स सुखरूप मिळाल्याने आई शालू शिंदे यांनी आभार मानले.
*असा लागला तपास* मुंबई विभाग पोलीस गृप वर सदर संदेश पाठविताच वाशी येथील पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोळीवाल यांनी पहूर पोलीसांशी संपर्क केला . सदर फोटोतील मुलगा आपलाच असून तो पहूर पोलीसांकडे सुरक्षीत असल्याचे समजताच त्या मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला . सदर मुल आज रोजी श्री . अहिरे यांच्या घरी असून त्यास घेण्यासाठी त्याचे पालक मुंबईहून पहरकडे रवाना झाले आहेत . उद्या सकाळी त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे .मतदानाच्या कामांमुळे वाढलेल्या ताण -तणावातून पहूर पोलीसांनी घडविलेल्या माणुसकिच्या दर्शनाने सर्वत्र कौतूक होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.