मुंबईत पावसाचा कहर ! रेल्वे वाहतूक विस्कळीत

0

सेवाग्राम एक्स्प्रेस 9 तासानंतर भुसावळ स्थानकावरून माघारी

भुसावळ :- मुंबईतील पावसाच्या हाहाकाराचा सर्वात जास्त फटका रेल्वे प्रशासनाला बसला असल्याचे दिसून येत आहे. जास्त पावसामुळे मुंबई तुंबली व ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे गाड्या पुढे न गेल्याने मुंबईच्या पावसाचा फटका भुसावळ रेल्वे विभागात सुद्धा बसल्याचे आज मंगळवार 2 जुलै रोजी दिसून आले आहे.

पहाटे पासूनच भुसावळ स्थानकावर काही प्रवासी गाड्या अडकल्या होत्या. यामध्ये पहाटे 3 वाजता सेवाग्राम एक्सप्रेस ही भुसावळ स्थानकावर आली, मात्र या गाडीला पुढे जाण्यास तिळमात्र संधी न मिळाल्याने जवळपास 8 तासाने ही गाडी पुन्हा माघारी पाठविण्यात आली. तर काही गाड्या मनमाड मार्गे वळविण्यात आल्या. सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी सुमारे 8 ते 9 तास भुसावळ स्थानकावर अडकल्याने प्रवाश्याना अतोनात त्रास झाला .

दरम्यान रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर व एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवाश्यानी परत केलेल्या तिकिटांची भरपाई (रक्कम) अदा करून सहकार्य केले. मुंबई येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या  संततधार पावसाने कहर केला असून या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले तसेच घाट येथे झालेल्या ब्रेक डाऊन मुळे अचानक सर्व रेल्वे गाड्या जिथल्या तिथे थांबल्या. पाऊस जास्त असल्याने कार्य करण्यास अनेक अडचणी येत असल्याने अनेक पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर काही एक्सप्रेस गाड्या मनमाड मार्गे वळविण्यात आल्या आहेत. तर काही  गाड्यत्यामुळे प्रवासी गाडयाना

पावसामुळे भुसावळ येथे राञी 3 वाजेपासुन सेवाग्राम एक्सप्रेस अडकून पडली होती .मुंबईकडे मुसळधार पाऊस रात्रभरापासुन  सुरू असल्याने रेल्वे मार्ग हा ठप्प  झालेला आहे  त्यामुळे भुसावळ रेल्वे स्टेशनवरती 8 तास प्रवासी हे अडकुन पडले होते. तर दररोज अप डाऊन करणा-या प्रवाश्यामध्ये  अनेकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून एस टी महामंडळाच्या बस ला प्राधान्य दिले तर काहींनि खाजगी वाहनाने आपले कार्यालय वा कांमाचे ठिकाण गाठले . भुसावळ रेल्वे स्टेशनवरती सध्या एकच गर्दी प्रवाशांची बघायला मिळत आहे.

कर्जत जवळील ठाकूरवाडी स्थानकाजवळ मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे अपघातामुळे रविवारी रात्री भुसावळ-पुणे धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस केवळ नाशिकपर्यंत चालवण्यात आली तर सोमवारी सकाळी सात वाजता सुटणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजरदेखील नाशिकपर्यंत चालवण्यात आली तसेच मनमाड-एलटीटी दरम्यान धावणारी गोदावरी एक्स्प्रेसदेखील ईगतपुरीपर्यंत चालवण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला.

मालगाडी घसरल्याने वाहतूक ठप्प

कर्जत व लोणावळादरम्यान असलेल्या ठाकुरवाडी घाट परीसरात सोमवारी पहाटे रुळावरून मालगाडी घसरल्याने पुणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. भुसावळ विभागातील प्रवाशांना या अपघातामुळे मोठा मनस्ताप सोसावा लागला. रविवारी रात्री पुण्याकडे निघालेल्या हुतात्मा एक्स्प्रेस पहाटेच्या सुमारास नाशिक स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले तर सोमवारी सकाळी अप मुंबई पॅसेंजरदेखील नाशिक स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली तसेच मनमाड येथून एलटीटीपर्यंत धावणारी गोदावरी एक्स्प्रेसदेखील ईगतपुरीपर्यंत चालवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. खाजगी बसेसला मात्र यामुळे गर्दी वाढल्याचे चित्र होते.

Leave A Reply

Your email address will not be published.