नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे पुण्यात निधन

0

जळगाव, दि.२९ –

नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे आज रविवारी सकाळी ७ वाजता पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५८ वर्ष होते.

जळगाव म.न.पा. चे जेष्ठ नगरसेवक अण्णासो. नरेंद्र भास्करराव पाटील यांचे आज सकाळी पुणे येथे दुःखद निधन झाले त्यांना रात्री पर्यंत जळगावात आणण्यात येईल. नरेंद्र पाटील घरात पडल्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती २२ दिवसापूर्वी पुण्यात डॉ पारसनीस यांनी रुबी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया केली आज रविवारी सकाळी ७ वाजता पुण्यात रुबी हॉस्पिटल मध्ये त्याची प्राणज्योत मालवली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, विनम्र श्रद्धांजली

Leave A Reply

Your email address will not be published.