माजी आमदार शिक्षण महर्षी सुरेशदादा पाटील यांचे निधन

0


चोपडा | प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ सुरेशदादा पाटील यांचे दिनांक 1 मे रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास नृसिंह हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. त्यांचे वय 95 वर्षे होते. मा. सुरेशदादा पाटील यांनी 1983 ते 1985 या काळात तालुक्याची आमदारकी भूषविली होती. तालुक्यात राजकारण आणि समाजकारण कसे करावे याबाबतचा आदर्श म्हणजे दादासाहेब होते. अनेकांचे संसार त्यांनी फुलविले आहेत. अनेकांचे घर बांधणीचे स्वप्न पूर्ती ने दादासाहेबांना खूप आनंद व्हायचा आणि नवीन घरात दादासाहेब संपूर्ण फिरून पाठीवर मायेचा हात देत. दादासाहेब आज आपल्याला सोडून निघून गेलेत. ज्यांना ज्यांना हा निरोप मिळाला त्यांचे डोळे पाणावले असतील. दादासाहेबच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. दादासाहेबांच्या परिवारास दुःख झेलण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच प्रार्थना।
महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय शरदचंद्रिका सुरेश पाटील यांचे पती कथा चोपडा शहर आणि तालुक्यात शिक्षणाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी डॉ सुरेशदादा गंभीर पाटील यांचे महाराष्ट्र स्थापना दिन तथा कामगार दिनी दुपारी ४.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. दिनाक १ मे रोजी त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना शहरातील डॉ दीपक पाटील यांच्या नृसिंह या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मा.डॉ सुरेशदादा पाटील यांनी चोपडा शहरात १९६९ साली उच्च शिक्षण ची व्यवस्था व्हावी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना केली होती तसेच सातपुडा पर्वत आदिवासी भागात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून कर्जाने ता चोपडा येथेही आदिवासी सेवा मंडळाची स्थापना करून तसेच शहरात कस्तुरबा महिला समाज शिक्षण संस्थेचे स्थापना करून शिक्षणाची गंगा आणून तालुका शालेय व उच्च शिक्षित करण्यासाठी अथक परिश्रमाने व्यवस्था केली. नंतर या संस्थेत दादासाहेबांच्या पत्नी तथा महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट शिक्षण मंत्री या उच्च शिक्षित असल्याने त्यांनी मानसेवी तत्वावर कोणत्याही मानधनाशिवाय या महाविद्यालयात शिकविले. आज त्या संस्थेत बालवाडी पासून तर उच्च शिक्षणाची सर्व व्यवस्था आहे. वैद्यकीय शिक्षण आणि इंजिनिअरिंग चे शिक्षण वगळता इतर सर्व शिक्षणाची व्यवस्था मा डॉ. सुरेशदादा पाटील यांनी चोपडा तालुक्यात केली असल्याने तालुका शिक्षित होऊन जगभर या संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून संस्थेला नाव लौकिक प्राप्त झाला आहे.
दादासाहेबांच्या जाण्याने त्यांचा परिवार अर्थात त्यांचे ज्येष्ठ पुत्र डॉक्टर शेखर पाटील आणि चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील यांचे पितृ छत्र हरपल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर देवो ही प्रार्थना….

Leave A Reply

Your email address will not be published.