माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा ऊर्जा विभागातर्फे गौरव

0

अमळनेर(प्रतिनिधी) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा ऊर्जा विभागातर्फे गौरव करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे राजभवन येथील बंगल्यासह ४ कृषीपंपांचे  विजबील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेरच्या महावितरण प्रशासना जवळ भरले होते.

याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने  जाहीर केलेल्या कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० मध्ये माजी आमदार साहेबराव पाटील यांना एक जागरूक कृषिपंप वीज ग्राहक म्हणून सहभागी झाल्याबद्दल व वीज देयक थकबाकी भरून महावितरण ला सहकार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित केले आहे.

डॉ.नरेंद्र गीते सह व्यवस्थापक संचालक महावितरण यांच्या कडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.