महिलांच्या सहभागाने नगरपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी 

मुक्ताईनगर शहरातील पाणी टंचाई बाबत वारंवार निवेदन देऊनही तात्काळ उपाययोजना न झाल्यामुळे शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिलांचा सहभागाने नगरपंचायत कार्यालयावर प्रचंड हंडा मोर्चा काढण्यात आला होता. प्रसंगी मुख्याधिकारी शाम गोसावी व नगराध्यक्ष नजमा तडवी यांना आंदोलन महिला व शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेराव घालून तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी लावून धरली ब्बल एक तास चर्चेअंती  मुख्याधिकार्‍यांनी पाच दिवसाच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन आंदोलन महिला व शिवसेना पदाधिकार्‍यांना दिले. दरम्यान शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याचे शहर शासनाच्या हतनूर धरणात प्रकल्पासाठी विस्थापित धरणग्रस्त शहर आहे. शहराचे जुन्या वस्तीमधून नव्या वस्तीमध्ये स्थलांतर करताना शासनाने एक ना अनेक सार्वजनिक जीवनावश्यक सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात अभ्यासपूर्ण नियोजना अभावी लोकप्रतिनिधींच्या कुंब्बट विचारसरणीमुळे शहरवासीयांची आजतागायत पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन होत आहे. भारत निर्माण योजनेच्या नावाखाली पाच कोटी रुपये खर्च करूनही लोकप्रतिनिधी व तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना आजतागायत कारणे झाली नसून आज नागरिकांची अवस्था नदी उशाला अन् कोरड घशाला अशी झालेली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाला. शासनाच्या धोरणानुसार सदरील निधी हा अत्यावश्यक मूलभूत सेवांसाठी प्राथमिकता वापरण्यात येणार्‍या अपेक्षित होते. त्यानुसार पाणी प्रश्न हा मुक्ताईनगर आतील नागरिकांची तीव्र समस्या असल्याने ती आधी सोडवणे आवश्यक असताना ठेकेदारी व त्यातील टक्केवारीच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारचे अभ्यासपूर्ण नियोजन न करता फक्त कमिशनचा उगम समजून उलट-सुलट कामांना प्राधान्य दिलेले आहे. रस्ते आधी का गटारी यादी असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला असतांना रस्ते करण्याची घाई करून गटारी साठी रस्ते तोडायचे असा उपक्रम आधार शासन घेणार आहे. कारण भूमिगत गटारी मंजूर झाल्याची चर्चा आहे. आज रोजी झालेल्या रस्त्यांना केवळ सहा महिन्यापेक्षा आयुष्य नसल्याचे समजते म्हणून शासनाचा निधी हा केवळ गिरं कृत करण्याचा प्रकार झालेला असून आज निधी जर पिण्याच्या पाण्याच्या समस्या वर खर्च झाला असता व व्यवस्थित आराखडा करून शहराचे शुद्धीकरण केले असते तर आज गेल्या एक महिन्यापासून व पाऊस पडल्यानंतर नदीला पूर आल्यावरही ही तब्बल एक महिना म्हणजे दोन महिने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. यातच नगरपंचायत प्रशासनातर्फे कोणतेही ठोस पावले उचलल्याचे दिसून आल्याने शिवसेनेने वारंवार लेखी निवेदन देऊन शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला परंतु येथील सुस्तावलेल्या प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कायम दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेला महिलांच्या सहभागाने हंडा मोर्चा काढावा लागत आहे ही या पंचायतीच्या हलगर्जीपणाची पावती आहे असे निवेदनात म्हटले आहे.
मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, अ‍ॅड.मनोहर खैरनार, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, माजी तालुकाप्रमुख प्रमोद देशमुख, शहर प्रमुख गणेश टोंगे, गटनेते राजेंद्र हिवराळे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, उपतालुकाप्रमुख बाळा भालशंकर, माजी उपसरपंच जाफर अली, शकुर जमदार, मुशीर मन्यार, सलीम खान, हारून मिस्त्री, शेख शकील, राजेंद्र तळेले,  विठ्ठल तळेले, शहर संघटक वसंत भलभले, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुकाप्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख आकाश सापधरे, महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, तालुका संघटक शोभा कोळी,  शहर संघटक सरिता कोळी, उपशहर संघटिका शारदा भोई, नगरसेविका सविता भलभले,  ज्योत्स्ना तायडे, अनिता मराठे, ज्योती पाटील, कुसुम बाविस्कर, लता माळी, दुर्गा मराठे, मीनाताई देशमुख, शोभा शिंगोटे, सुषमा माळी, भारती गावंडे, शोभा निगडे, अलका मराठे, अनुसया मराठे, सुनिता माळी, ज्योती मालचे, कोकिळा कुंभार, धृपदाबाई कोळी, उषाबाई मराठे, कलाबाई मराठे, बेबाबाई कोळी, जया सुरंगे, लता सुरंगे, रेखा कोळी, अर्चना गोरले, सुनंदा ठोके, हजरा पिंजारी, सिंधुबाई जुमळे यांच्यासह संतोष माळी, पप्पू मराठे, अफसर शहा, दीपक खुळे, मनोज मराठे, अण्णा धनगर, भोला तेजी, साहेबराव मराठे, मुकेश साहेबराव मराठे, मुकेश डवले, सातशे ते आठशे महिला उपस्थित होत्या.
संतप्त महिलांचा मोर्चा पाहता मुख्याधिकार्‍यांनी तात्काळ शहरातील पाणीपुरवठा पाच दिवसात सगळेच करण्याच्या व 50 एचपी चे मोटर पंप तसेच शहरात सुरू असलेल्या नवीन विंधन विहिरी व जुन्या विंधन विहिरीवर पाण्याची की समजा पाहून त्यात त्यानुसार पंप टाकण्यात येतील व संबंधित प्रभागातील तातडीच्या पाणीपुरवठा हा सुरळीत करण्यात येईल आणि सध्याची टंचाईची भीषण परिस्थिती पाहता शासनाकडे पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचे टँकरची मागणी करण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी शाम गोसावी नगराध्यक्ष नजमा तडवी यांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.