महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न

0

चोपडा :-  येथील महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दरवर्षी योगासंबंधी वर्ग अथवा शिबिर घेतले जाते. संस्था दोन वर्षापासून 21 जून  आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आहे .21 जून 2021 रोजी योग दिवस साजरा करण्यात आला .यावेळी श्रीराम नगर परिसरात श्री जितेंद्र प्रकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सहा वाजता योगा क्लास घेऊन योग दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी , विश्व संगीत दिवसाच्या निमित्ताने श्री ह भ प गोपीचंद महाराज चोपडा यांचे सुश्राव्य गायन झाले .यानिमित्ताने सुरुवातीला श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला  माल्यार्पण करून क्लास सुरू झाला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.   यावेळी श्री , जितेंद्र प्रकाश चौधरी योग मार्गदर्शक व गायक ह भ प श्री गोपीचंद महाराज यांचा यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन श्री प्रकाश शंकर चौधरी यांनी केले. यावेळी के डी चौधरी सर चौधरी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले .संस्थेचे अध्यक्ष श्री , देवकांत के चौधरी यांनी कार्यक्रमाचे तयारी केली. शेवटी इम्युनिटी काढा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.