महाराष्ट्रातील पहिल्या अँटीबॉडी तपासणी केंद्रांचा शुभारंभ

0

जळगाव | प्रतिनिधी

इंडियन रेडक्रॉस सोसायटी व तारा कॉम्प्युटराइज लॅबोरेटोरी, जळगाव यांच्या सयुंक्त विद्यमाने अँटीबॉडी तपासणी केंद्रांचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी – मा. श्री. अभिजित राउत (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते.

हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना व  आत्ताच्या परिस्थितीत अँटीबॉडी तपासणीचे महत्व आणि या विषयी रेडक्रॉस रक्तपेढीचे चेयरमन व तारा लॅबोरेटोरीचे संचालक डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी माहिती दिली. हा उपक्रम सुरु करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांची दूरदृष्टी आणि संपूर्ण नियोजन यामुळे हा प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असे मनोगत रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन व्यक्त केले.

माननीय जिल्हाधिकारी मा. श्री. अभिजित राउत यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि,  इंडियन रेडक्रॉस सोसायटी व तारा कॉम्प्युटराइज लॅबोरेटोरी, जळगाव यांच्या सयुंक्त विद्यमाने  सुरु करण्यात आलेले हे अँटीबॉडी तपासणी केंद्र हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र असून एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे कि नाही किंवा होऊन गेला आहे का याबाबतच्या शंकेचे समाधान करणे शक्य होणार आहे. अँटीबॉडी तपासणी करण्याची कोणतीही व्यवस्था सद्य परिस्थितीत शासकीय स्तरावर उपलब्ध नाही. हि व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून  नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्लाझ्मा डोनरचा शोध घेऊन जास्तीत जास्त अत्यवस्थ कोविड रुग्णांना उपचार करण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या तपासणी दरापेक्षा निम्या दरात हि तपासणी करण्यात येणार असून पत्रकार व हेल्थ वर्कर्स यांना जास्तीत जास्त सवलत देण्याचा मानस आहे.

या कार्यक्रमासाठी रेडक्रॉसचे कार्यकारिणी सदस्य श्री. सुभाष सांखला, श्री. अनिल कांकरिया श्री. अनिल शिरसाळे, डॉ. अपर्णा मकासरे, श्री.धनंजय जकातदार,  प्रशासकीय  अधिकारी श्री. लक्ष्मण तिवारी, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, श्री. स्वप्नील वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, श्री. गणेश शिंपी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.