महात्मा फुले ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी नरेंद्र महाजन

0

धरणगाव (प्रतिनीधी) : येथील माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र साहेबराव महाजन यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती नुकतेच महात्मा फुले ब्रिग्रेडचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी एका पत्रान्वये केली आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील , शिवसेना जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष नीलेश चौधरी , नगरसेविका सुरेखा विजय महाजन परीट धोबी समाजाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद रोकडे यांनी सत्कार करुन अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.