मनी लॉंड्रिगप्रकरण : डी.शिवकुमार यांना 1 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

0

नवी दिल्ली : मनी लॉंड्रिगप्रकरणी अटकेत असलेले कर्नाटक कॉंग्रेसचे दिग्गज नेते डी.के.शिवकुमार यांना दिल्लीच्या एका न्यायालयाने 1 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश देताना शिवकुमार यांना सर्वांत प्रथम न्यायालयात नेण्यास सांगितले.

विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहर यांनी ईडीला निर्देश दिला आहे की, जर डॉक्‍टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल असे सांगितले तर त्यांना दाखल करावे लागेल. उपचारानंतर जर त्यांना डिस्चार्ज दिला तर त्यांचा मुक्काम तिहार कारागृहात असेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, या अगोदर ईडीने शिवकुमार यांना चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.