मनवेल येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ अंतर्गत आरोग्य तपासणीला पुन्हा सुरुवात

0

मनवेल ता.यावल (वार्ताहर) साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मनवेल येथे दि.१६ एप्रिल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवाडीवले यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य तपासणीस उपक्रमास पुन्हा सुरुवात झाली आहे.

कोवीड १९ च्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरोघरी आशा वर्कर, शिक्षक ,अंगणवाडी सेविका यांच्या दोन टीम मनवेलढ गावात जाऊन प्रत्येक घरा- घरात प्रत्येक व्यक्तीला तपासून करोना संशयित रुग्ण शोधून त्यांना तपासणी साठी प्रा.आ. केंद्रात पाठवीत आहे.त्याचबरोबर अँटीजन टेस्ट करणे ही सुरू आहे.
ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण निघेल त्या भागात नागरिकांची आरोग्य तपासणी व जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे काम प्रा. आरोग्य केंद्र अंतर्गत करणे चालू आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही सुरू आहेच.तरी सर्वाना प्रा. आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आलेल्या टीमला सहकार्य करा व कोरोनाचे लक्षण असल्यास टेस्ट करून घ्या व प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी हातभार करा.असे आवाहन साकळी आरोग्य प्रशासनातर्के डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवडीवाले यांनी केले आहे.
याकामी आशा स्वंयमसेविका रंजना कोळी ,पुनम पाटील, शिक्षक सुनिल काळे प्रविण पाटील, अंगणवाडी सेविका कल्पना पाटील,मदतनीस ज्योति इंधाटे आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ आरोग्य सेविका सविता कोळी परीश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.