मनमोहक आकर्षक सजावटीने सजलेल्या माहेरवाशीन गौरींच्या दर्शनासाठी महिलांची गर्दी

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काल आपल्या माहेरी आलेल्या जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे स्वागत पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात झाले. आज त्यांना गोड नैवेद्य दाखवण्यात आला. बहुतांश ठिकाणी माहेरी आलेल्या या गौरींला सुंदर आकर्षक मनमोहक सजावट करून आरुढ केलेले आहे. आज दुपारपासुन रात्री पर्यंत असंख्य महिला वर्गाने ज्या घरी गौरींची स्थापना करण्यात आली आहे.  तेथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

दुपारी पुजा होऊन गोड पुरणाचा ,सोबत सोळा भाज्या असा साग्रसंगीत बेत माहेरी आलेल्या गौराईसाठी आज होता. घरोघरी गणपतीसाठी जशी सजावट करतात तशीच आकर्षक सजावट या महालक्ष्मीच्या सभोवताली करण्यात आली आहे. या ठिकाणी पाच फळं, मका, केळी,विविध पक्वान्न यांचीही सजावटीने परिसरात आनंद निर्माण झाला आहे.

दुपारी या गौराई यांचे दर्शन घेण्यासाठी ,आपले नवस, मनोकामना पुर्ण करण्यासाठी हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिलांची गर्दी होती. रात्री पर्यंत शहरातील विविध घरात गौराईच्या दर्शनासाठी महिला अधिक प्रमाणात दिसत होत्या. रात्री जागरण, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे या निमित्ताने तीन दिवस आपल्या गावी येत असतात. करोनामुळे मात्र या उत्सव, सणांवर निश्चितच परिणाम झाल्याचे जाणवत असले तरी  भाविकांचा उत्साह श्रद्धा मात्र कमी नाही हे या निमित्ताने दिसुन येते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.