मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीत २.१८ लाख वॅगनद्वारा ११.४६ दशलक्ष टन मालाची केली वाहतूक

0

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे संपूर्ण जगात पसरलेल्या कोविड १९  साथीच्या आजाराला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न  करून  महत्त्वपूर्ण भूमिका वठवित आहे.  पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन -१ पासूनच रेल्वेने माल आणि पार्सल वाहतूक सुरू ठेवली आहे.

लॉकडाऊन कालावधीत जेव्हा  सर्व देशभर कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या भीतीने   सर्वजण आपल्या घरातच अडकले आहेत, तेव्हा मध्य रेल्वेने ११.४६ दशलक्ष टन मालाची  २.१८ लाख वॅगन द्वारे वाहतूक केली आहे. त्यात कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तू यांचा समावेश होता.

या कोरोना विषाणूचा धोका असताना,  विजेचा अखंडित पुरवठा व्हावा यासाठी केवळ मध्य रेल्वेने   कोळशाच्या ८७,५५९ वॅगन विविध वीज प्रकल्पांकडे नेल्या. तसेच सर्वांना वेळेवर धान्य व पुरवठ्याचे वितरण राखण्यासाठी अन्नधान्य व साखर यांचे २,५७७ वॅगनची  वाहतूक केली;  शेतकर्‍यांच्या हितासाठी ८,१९४ वॅगन खते व २,०९३ वॅगन कांदा, सर्व भागधारकांना  सुरळीत इंधन पुरवठा करण्यासाठी २१,८६० टँक पेट्रोलियम पदार्थ;  उद्योग चालविण्यासाठी लोह व स्टीलच्या ४,६०० वॅगन कंटेनरच्या ६९,५८८ वॅगन  आणि इतर विविध उत्पादनांच्या सुमारे ९,२११ वॅगनचा समावेश आहे .

या लॉकडाऊन कालावधीत जवळपास २.२२ लाख वॅगन मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभागांतील हद्दीत उतरले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी राखण्यासाठी मध्य रेल्वेनेही विशेष पार्सल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने १२,६२५ टन जीवनावश्यक वस्तूं ज्यात औषधे / फार्मा उत्पादने, अन्न / नाशवंत वस्तू, ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.