मद्याच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

0

जळगाव : दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगाव तालुक्यातील फुफणी येथे घडली. नंदा प्रकाश पाटील (वय ३५) असे जखमी विवाहितेचे नाव असून तिला ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे.

 

फुपणी (ता.जळगाव) येथे प्रकाश पाटील हे पत्नी नंदा व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. प्रकाश पाटील हे यांना दारुचे व्यसन आहे. दारू पिऊन येत असल्‍याने पत्नी नंदा यांच्यासोबत नेहमीच खटके उडून वाद होतात. रविवारी नंदा पाटील व दोन मुले घरी होते. यावेळी प्रकाश पाटील हे दारू पिवून घरी आले. यावेळी नंदा पाटील यांनी त्यांना दारु का पितात असे म्हटले. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादात मद्याच्या नशेत असलेल्या प्रकाश पाटील यांनी घरातील कुऱ्हाडीने पत्नी नंदा हिच्या डोक्यात वार केले.

 

प्रकाश पाटलाने कुऱ्हाडीने हल्ला चढावल्याने नंदाबाई खाली कोसळल्या. दोघं पोरं मदतीसाठी किंचाळ्या मारतच चुलत काकाच्या घरी धावत सुटले. यानंतर प्रकाश पाटील यांच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी घराकडे धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडलेल्या नंदा पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान नंदा पाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्या बेशुध्दच असून त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनकच आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेत कार्यवाही सुरु केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.