मद्यपी कारचालकामुळे सैनिकाच्या मांडीचे हाड मोडले!

0

जळगाव, दि.14 –
धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे लग्न सोहळा आटोपून मावस भावासाठी मुलगी पाहायला तिघे दुचाकीने भादली येथे जात होते. असोदा गावाजवळ समोरून भरधाव वेगात येणार्‍या कारने त्यांना जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमळनेर तालुक्यातील तांदळी येथील सतिष भिमराव कोळी व त्यांची आई तुळसाबाई भिमराव कोळी हे आज सकाळी चांदसर येथे लग्नाला आले होते.
मुलगी पाहण्यासाठी जात होते
लग्न आटोपून सतिष कोळी यांचा मावस भाऊ भुषण सुनिल शिंदे(कोळी) व सतिषची आई हे तिघे सतिषला मुलगी पाहण्यासाठी भादली येथे जाण्यासाठी निघाले. तिघे भुषणची विना क्रमांकाची शाईन गाडी घेवून भादलीकडे जात होते. यावेळी भुषण स्वतः गाडी चालवित होता.
भरधाव कारने दिली धडक
भादली येथे जात असताना असोदा गावाजवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या कार क्रमांक एमएच.19.सीके.501 ने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. भीषण अपघातात दोन्ही वाहनांची मोठी दुखापत झाली.
कारचालकासह चौघे मद्यपी
मोटारसायकलस्वारांना धडक देणार्‍या कारचालकासह कारमधील चौघे मद्यपी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यापैकी भुसावळ येथील फालक यांच्या मालकीची कार असल्याची माहिती नागरिकांनी दिली. अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला थांबविले असता, मद्यपी असल्याचे दिसून आले.
तिघे जखमी, भुषणच्या मांडीचे हाड मोडले
अपघातात तुळसाबाई व सतिष यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे. तर दुचाकी चालवित असलेल्या भुषण याला जबर दुखापत झाली असून त्याच्या मांडीचे हाड मोडल्याने रक्तस्त्राव झाला होता. तिघांना तात्काळ रिक्षेने उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.