भुसावळ स्थानकावर सचखंड एक्सप्रेस प्रवाशांनी अडीच तास रोखली !

0

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर आज सकाळी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस प्रवाशांनी तब्बल अडीच तासापासून रोखून ठेवली. गाडीतील शौचालयांमध्ये स्वच्छता नसून अतिशय घाण असल्याने प्रवाशांना आतोनात त्रास हॉट होता . दरम्यान त्याबाबतच तक्रार रस्त्याने अन्य स्थानकावर  वरिष्ठांकडे केली तरीदेखील त्याची दखल घेण्यात न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला .

गाडी भुसावळ स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांचा संताप तिव्र झाला व त्यांनी शौचालय स्वच्छतेची मागणी करीत  गाडी रोखून ठेवली व त्याबाबतची तक्रार भुसावळ स्थानकावर देखील केली.त्यानुसार सफाई कर्मचार्यानी पाहणी केली असता ब्लॉकेज मुळे ही अडचन उपस्थित झाल्याचे निदर्शनास आणले.  मात्र भुसावळ स्थानकावर देखील शौचालयाचा प्रश्न सोडविण्यात अडचण आल्याने गाडी पुढे रवाना करीत भुसावळ येथील दोन रेल्वे कर्मचारी नांदेड येथे रवाना केल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.