भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ १० रेल्वे गाड्या २ दिवस रद्द

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज शनिवार व रविवारी (दि. ८ व ९) असा दोन दिवसाचा ब्लॉक घेण्यात आल्याने भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे तुम्ही आधीच आरक्षण करून ठेवले असेल तर त्याचे तिकीट आपोआप रद्द होणार आहे.

रद्द केलेल्या गाड्या

गाडी क्रमांक १२११० मनमाड-मुंबई पंचवटी (८ व ९ जानेवारी)                                                                                              १२०७१ मुंबई-जालना (८ व ९ जानेवारी)
१२०७२ जालना-मुंबई (८ व ९ जानेवारी)
१२१०९ मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (८ व ९ जानेवारी)
१२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस आजपासून दोन दिवस १० रेल्वे गाड्या रद्द(८ व ९ जानेवारी)
१२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (७ व ९ जानेवारी)
१७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस (७ व ८ जानेवारी)
१७६१२ मुंबई-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस (८ व ९ जानेवारी)
१२१४० नागपूर-मुंबई सेवा ग्राम एक्स्प्रेस (७ व ८ जानेवारी)
१२१३९ मुंबई-नागपूर सेवा ग्राम (८ व ९ जानेवारी)

या ब्लॉकमुळे होणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना येणाऱ्या अनेक अडचणींमुळे मोठा मनस्ताप सहन लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.