भुसावळ रेल्वे स्थानकावरील उप स्टेशन मास्टरची आत्महत्या !

0

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील उप स्टेशन मास्टर पदावर कार्यरत असलेले मिलिंद दिवाकर मार्कंडे (वय 54) यांनी  रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी टिंबर मार्केटजवळ अपलूक लाईनवर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .

मिलिंद मार्कंडे हे मध्य रेल्वेओ.पी.टी.जी.विभागात भुसावळ रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उप स्टेशन मास्टर पदावर कार्यरत होते. दरम्यान, काल  १ मार्च रोजी सायंकाळी ६.१० वाजेच्या पूर्वी त्यांनी टिंबर मार्केट जवळ (अपलूक लाईन) खंबा नंबर ४४३/बी/४-१ जवळील रेल्वे रुळावर मान ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद १७४ सी.आर.पी.सी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.तपास लोहमार्ग पोलीस सपोनि बबन दिगंबर शिंदे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.