भुसावळ रेल्वे विभागातुन किसान एक्सप्रेस पार्सल गाड़ीद्वारे 608 टन मालाची वाहतूक

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे विभागातुन किसान एक्सप्रेस पार्सल गाड़ीद्वारे  608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे.

किसान एक्सप्रेस देवळाली ते दानापुर दि 7ऑगष्ट  पासून सुरु करण्यात आलेली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणी नुसार गाड़ीला मुजफ्फरपुर पर्यंत विस्तार करण्यात आला . एक दिवस चालणाऱ्या गाडीला मिळणारा प्रतिसाद बघून आठवड्यातून २ दिवस मंगळवार आणि शुक्रवार करण्यात आले. यामुळे जलद आणि स्वस्त वाहतुकीसह, चांगल्या किंमतीच्या आश्वासनासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे.

शेती उत्पादनांचा नाश होऊ नये. आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी किसान रेल महत्त्वपूर्ण आहे किसान रेल द्वारे हे सुनिश्चित केले जाते की, कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहचविले जाईल, ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होईल. छोट्या शेतकऱ्यांच्या आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या गरजा भागविणारी ही किसान रेल जीवन परिवर्तक म्हणून सिद्ध होईल. किसान रेलवे ला भुसावल विभागामधे चांगला प्रतिसाद भेटत असून किसान पार्सल गाड़ी ने आपल्या पहिल्या फेरी मधे 90.92 टन माल ची वाहतुक करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या फेरीमधे 99.58 टन माल ची वाहतुक , तिसरी फेरी मधे 151.59 टन माल ची वाहतुक , चौथ्या फेरी मधे 108.06 टन माल ची वाहतुक , आणि पाचव्या फेरी मधे 157.98 टन माल ची वाहतुक ही भुसावळ विभागाच्या महत्वाच्या स्टेशन जसे देवलाली ,नासिक,मनमाड ,जलगाँव , भुसावल , बुरहानपुर , खंडवा या स्टेशन येथून मालाची वाहतुक करण्यात आलेली आहे . ऑगस्ट महिन्यात भुसावळ विभागातुन किसान रेलवे द्वारे 608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे . मध्य रेल्वे आपल्या व्यवसाय विकास युनिटच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींशी सतत विपणन करून त्यांच्या मागण्या एकत्रित करत आहे.

सदर शेतकरी लोकाना त्यांचा माल बुक करण्यासाठी त्याना माल पॅक करून हा आपल्या जवळ पासच्या पार्सल ऑफिस मध्ये आणावा लागेल. सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स ठेवावी लागेल. शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर, व्यापारी ,बाजार समिती, आणि लोडर्स, याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल. शेतकरी बांधवानी या गाडीचा जास्तीत जास्त उपयोग घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.