भुसावळ रेल्वे कॉलनीत आई व मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ;

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील रेल्वेच्‍या गंगोत्री कॉलनी वसाहतीत आई व मुलगा या दोघांचे मृतदेह आढळून आल्‍याची घटना २८ मे गुरुवार रोजी सकाळच्या सुमारास उघडकिस आली. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. मात्र आई व मुलाचा मृत्यू कशामुुळे झाला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रेल्वे सुरक्षा बलाच्या शेजारी असलेल्या गंगोत्री कॉलनी रेल्वे वसाहतीमधील क्वार्टर क्रमांक आरबी-१/एच -६६२ मधील रहिवासी व रेल्वेचे वरिष्‍ठ अनुभाग अभियंता वर्कशॉप भुसावळ येथे कार्यरत फ्रान्सीस डॅनियल पाटेकर यांच्या घराजवळील परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी संबंधित विभागाला माहिती कळविली. रेल्वे व पोलीस प्रशासन यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत घराचे दरवाजे उघडले असता घटनास्थळी फ्रान्सीस डॅनियल (वय अंदाजे ५५) व त्यांची आई वय अंदाजे ७५ वर्षे नाव माहित नाही. यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह नगरपरिषद रुग्णालयात पाठविण्यात आले.

आई व मुलाच्‍या मृत्‍युचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन फ्रान्सीस डॅनियल यांना व त्यांच्या आईला काही दिवसापासून परिसरातील रहिवाशांनी बघितले नव्हते असे सांगण्यात आले. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास भुसावळ शहर पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.