भुसावळ भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे कोरोना बाधीत

0

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असून सर्वसामान्य नागरीकांसह भुसावळचे आमदार संजय सावकारे तसेच भुसावळ भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश अरुण नेमाडे, त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे वडील अरुण नेमाडे यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर ट्रामा केअर सेंटरसह रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना चाचणी करणे समाज व परीवाराच्या हिताच्या दृष्टीने हिताचेच – दिनेश नेमाडेनी केले आवाहन –
वडील अरुण नेमाडे यांना व्हायरल निमोनिया झाल्यानंतर मी माझी व पत्नी आरतीची कोरोना टेस्ट लागलीच करून घेतल्यानंतर तिघांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले त्या नंतर १३ सप्टेंबर रोजी त्यांचे वडिलांना भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे . तर नेमाडे व त्यांची पत्नी आरती भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

खोकलाव तापाचा त्रास सुरूवातीला जाणवला आता मात्र प्रकृती स्थिर आहे. कोरोनाला विनाकारण नागरीकांनी घाबरून न जाता त्रास झाल्यानंतर चाचणी करून घ्यावी मात्र लोक आजाराला घाबरून चाचणी करीत नसल्याने फैलाव वाढत आहे. नागरीक कोरोना टेस्ट न करता थेट उपचार करण्यावर भर देत आहेत मात्र कोरोना चाचणी करणे समाज व परीवाराच्या हिताच्या दृष्टीने चांगली बाब असल्याचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे म्हणाले .

Leave A Reply

Your email address will not be published.