भुसावळ तालुक्यात 24 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज !

0

शासकीय पंचनाम्यांना सुरवात

भुसावळ (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.या अनुषंगाने भुसावळ तालुक्यात   54 गावे असुन बेमोसमी पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार  24 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज भुसावळ तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी व्यक्त केला आहे.

भुसावळ तालुक्यात प्रार्थमिक  24 हजार हेक्टर  क्षेत्र शेतीचे नुकसान परतीच्या अवकाळी पावसामुळे झाले असून प्रशासनाने शासकीय पंचनाम्यांना सुरवात केली आहे यात सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्र शेत जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती येथील तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी दिली. सुमारे 24 हजार हेक्टर क्षेत्र बाधित  असून यात कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन , आदी पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे . तालुक्यात 30 तारखेपासुन पंचनाम्यास सुरवात झाली असून यात  एकूण 54 गावंचा समावेश आहे पंचनामा कामा करिता 16 तलाठी , 32 ग्रामसेवक, 9 कृषि सहाय्यक अधिकारी यांचा समावेश आहे .6  नोव्हेंबर पर्यंत अंतिम यादी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे भुसावळ तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी सांगितले आहे. ज्यांनी पिकविम्याचा लाभ घेतला आहे त्यांना पण नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही रहाणे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.