भुसावळात आयकॉन क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

0

भुसावळ (प्रतिनिधी)- अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर भुसावळ शहरात  तालुक्यातील नागरिकांना २४ तास सेवा देणारे आयकॉन क्रिटिकल केअर अँण्ड स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न झाले.

सध्याच्या काळात कोरोनाने थैमान मांडून अनेकांचे बळी घेतले आहे. कित्येक परिवार बेघर झाले आहे.अनेक तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.यानंतरही कोरोनाचा तांडव सुरू असून येणारा तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांसाठी धोका निर्माण होण्याचे संकेत असून लहान मुलांना योग्य तो उपचार मिळावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भुसावळ शहरात प्लॉट नंबर १६, पहिला मजला, हिमालय ग्रुप भुसावळ. ब्लड बँक जवळ अशोक हॉटेलच्या मागे जामनेर रोड येथे  आयकॉन क्रिटिकल केअर अँण्ड मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन  १४ मे रोजी सायंकाळी  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर व आमदार तथा माजी पालक मंत्री जळगाव जिल्हा संजयजी सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाले.

भुसावळ तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने आयकॉन क्रिटिकल केअर अँण्ड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल त्यामाध्यमातून शहरवासीयांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे.यामध्ये अतिदक्षता विभाग ,क्रिटिकल केअर, हृदयरोग विभाग,ट्रामा सेंटर,डायबेटिक सेंटर, विलगीकरण सुविधा,वीस ऑक्सिजन बेड ,बायपॅप व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सटेटर, 24 तास तज्ञ डॉक्टर, 24 तास ॲम्ब्युलन्स,प्रशिक्षित नर्सिंग व डॉक्टर स्टाफ उपलब्ध राहणार आहे.भुसावळ शहरातील रुग्णांना उपचारादरम्यान जळगाव जाण्याची वेळ येणार नाही अशा तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय चौधरी,डॉ. सुरज भोळे, डॉ. अमोल रावते,डॉ. निलेश क्षीरसागर,डॉ. किरण पाटील प्राध्यापक प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.अपघात झाल्यास लवकरच आयकॉन क्रिटिकल केअर अँण्ड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनची सुविधा उपलब्ध होणार असून २४ तास स्पेशालिस्ट डॉक्टर हजर राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.