भारत चीनला आणखी मोठा दणका देण्याच्या तयारीत ; घेणार हा मोठा निर्णय?

0

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर सरकार आता चीनमधील आणखी काही 275 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकार हे पहात आहे की हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या गोपनीयतेसाठी धोका दर्शवित नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चीन आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. यानंतर भारताने आणखी 47 अ‍ॅप्स बंद केले आहे. या 47 अ‍ॅप्सची यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे.

इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता 250 हून अधिक चिनी अ‍ॅप्सची तपासणी करत आहे. यात युझरच्या प्रायव्हसी किंवा माहितीचे उल्लंघन तर होत नाही आहे ना, याची पाहणी केली जाणार आहे. मुख्य म्हणजे भारतानं तयार केलेल्या यादीमध्ये अलिबाबा (Alibaba), पब्जी (PUBG), टेन्सेंट (Tencent), झिओमी सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचाही समावेश आहे.

सरकार सध्या या 275 अ‍ॅप्सवर नजर ठेवून आहे. हे अ‍ॅप्स नॅशनल सिक्यूरिटी किंवा युझरची माहिती तर लीक करत नाही आहे ना, याची तपासणी केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्याचे सर्व्हर चीनमध्ये आहे, अशा कंपन्यांचे अ‍ॅप्स बॅन केले जाणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं तयार केलेल्या यादीमध्ये काही प्रमुख गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश आहे. यात PUBG Mobile, Ludo World यांचा समावेश आहे. तसेच, रिव्ह्यू केले जात असलेल्या लिस्टमध्ये Xiaomiने तयार केलेले Zili अ‍ॅप, इ-कॉमर्स Alibabaचे Aliexpress अ‍ॅप, Resso अ‍ॅप आणि Bytedance चे ULike अ‍ॅप यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.