भारतीय पत्रकार संघाच्या मुंबई कार्यालयाचे माजी गृहमंत्री कृपाशंकर यांच्या हस्ते उदघाटन

0

मुंबई/ (विवेक देशपांडे) – भारतीय पत्रकार संघ Association of Indian journalists च्या मुंबई कार्यालयाचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह यांनी विधिवत उदघाटन केले. राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम जी सेन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम एस शेख यांनी सत्कार केला.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कार्यालयास भेट दिली. त्यांचे स्वागत व सत्कार करणेत आला. बृहन् मुंबई महापालिका नगरसेवक राजू भाऊ पेडणेकर उपस्थित होते. या कार्यक्रमास राज्यभरातून पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.पत्रकार संघाचे पदाधिकारी शाहनवाज शेख व शफिक शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.