भातखंडे माध्यमिक विद्यालयात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

0

भातखंडे, ता. भडगाव : तालुक्यातील भातखंडे येथे कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच संपन्न झाली.

यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी गिरड गटाचे केंद्रप्रमुख प्रवीण सुतार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ए बी बोरसे, माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे शाळेचे मुख्याध्यापक एस आर पाटील, भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, माध्यमिक विद्यालय अंतुर्ली श्री जाधव. भातखंडे बुद्रुक जि प मराठी शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील सह गिरड केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक- शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे सुरुवात प्रास्ताविका ने झाली प्रास्तविक भातखंडे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक  बी एन पाटील  यांनी केले प्रास्ताविकातून त्यांनी शिक्षण परिषद महत्त्व विशद केले. व  “शिक्षण परिषद” ही शिक्षण परिषदेवर असलेली कविता त्यांनी उपस्थितांसमोर सादर केली. नंतर स्वागत गीत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांनी सादर केली. त्यांना साथ संगीत शाळेतील कलाशिक्षक संदीप पाटील व संदीप सोनवणे यांनी दिली प्रमुख उपस्थिताच्या  हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले नंतर कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या हस्ते ड्रॉइंग पेपर वर त्यांना गणपतीचे चित्र रंगवण्याचे सांगितले आणि ते अतिशय उत्कृष्ट  काढण्यात आले ही संकल्पना शाळेतील कलाशिक्षक संदीप पाटील यांनी मांडली चित्रकला व कार्यानुभव चे महत्व यावेळी त्यांनी विशद केले उपस्थितांचे स्वागत व सत्कार करण्यात आला शिक्षण परिषदेच्या वेळी इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा नमुना पाठ विद्यालयातील संदीप सोनवणे  यांनी घेतला त्यावर चर्चा व समिक्षण करण्यात आले पाठ अतिशय उत्कृष्ट घेतल्याचे अभिप्राय उपस्थित शिक्षक बंधूंनी दिला नंतर मूल्यवर्धन घेण्यात आले शिक्षण परिषदेच्या वेळी वेगवेगळ्या परिपत्रकांची वाचन करण्यात आली शालेय पोषण आहार व वेगवेगळ्या परिपत्रकांची करावयाची कार्यवाही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या ओळखपत्रांचे वाटप शिक्षण परिषद वेळी करण्यात आले. एकंदरीत शिक्षण परिषदेत शैक्षणिक विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले शिक्षण परिषद अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बी एन पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.