भाजप-सेनेमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा राहिलेलो नाही – खडसे

0

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आज शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी गेले आहे, यावेळी त्यांना शिवसेना, भाजपामध्ये सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले शिवसेना, भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा राहिलेलो नाही, अशी खंत बोलून दाखवली.

एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून, भाजपच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर आहेत. भाजपत एवढी खलबतं सुरू असताना खडसे मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, निवडणुकीचा निकाल काहीही लागो, मी कायम शिर्डीत बाबांच्या दर्शनाला येतो, असं खडसेंनी सांगितलं. ‘दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काय ठरलं याची मला कल्पना नाही. त्यामुळे याबद्दल मी फारसं भाष्य करू शकत नाही. मात्र शिवसेनेची मागणी स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवं’, असं म्हणत त्यांनी राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपावर बॅकफूटवर आली आहे का या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. भाजपा बॅकफूटवर आलेली नाही. तणाव वाढवायचा नसल्यानं त्यांच्याकडून शांतपणे चर्चा सुरू आहे. युती तुटू नये आणि महायुतीचं सरकार स्थापन व्हावं या भावनेनं भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.