भाजप गटनेते भगत बालाणींच्या रिकाम्या खुर्चीचा सेनेकडून सत्कार !

0

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते नगरसेवक भगत बालाणी यांच्या कार्यालयातील खुर्चीचा शिवसेना नगरसेवक माजी महापौर विष्णू भंगाळे, उपमहापौर सुनील महाजन, शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी यांच्यातर्फे शाल श्रीफळ, हार, गुच्छे आणि ५०० रुपये ठेवून सत्कार करण्यात आला.
महानगरपालिकेत सध्या भाजपचे गटनेते भगत बालाणी आणि शिवसेनेचे सुनील महाजन, बंटी जोशी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्यात पत्रकार परिषद घेऊन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेना नेते सुरेशदादा जैन आणि प्रदीप रायसोनी यांच्या कार्याचे कौतुक बालाणी यांनी केले होते. त्याचाच एक भाग म्हणून भगत बालाणी यांचा सत्कार करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

आज बुधवारी सकाळी ११ वाजता भगत बालाणी यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. तथापि भगत बालाणी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहिले नाही. शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांनी बालाणी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता बालाणी यांनी उपस्थित राहण्याची असमर्थता दर्शविली. त्यामुळे बालाणी यांच्या दालनात जाऊन त्यांच्या रिकाम्या खुर्चीचा सत्कार करण्यात आला.

भगत बालाणी यांच्या रिकाम्या खुर्चीचा अजब प्रकारच्या सत्कार झाल्याची महापालिकेत मात्र खमंग चर्चा होती.

Leave A Reply

Your email address will not be published.