भाजपच्या महिला नेत्याची गोळी झाडून हत्या

0

गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुनेश गोदारा असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान, ही हत्या महिलेच्या पती सुनील गोदारा याने केला असल्याचा आरोप होत असून तो सध्या फरार आहे.

मुनेश ही भाजपच्या किसान मोर्चाच्या राज्य सचिव होत्या. दरम्यान, ३४ वर्षीय मुनेश यांच्या चारित्र्यावर पती सुनील गोदाराला संशय होता. आरोपी दादरी येथील रहिवासी असून गुरुग्रामच्या सेक्टर 93 मध्ये तो पत्नी आणि मुलीसह भाड्यावर घर घेऊन राहत होता.

पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याचा सुनीलला संशय होता. या विषयावरुन दोघांमध्ये वाद व्हायचे. शनिवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी सुनीलने मद्यपान केलं होतं. मुनेश किचनमध्ये जाऊन फोनवर बोलत होत्या. यावरुन सुनीलचा संताप अनावर झाला आणि त्याने आपली सर्व्हिस रिवॉल्व्हर काढून मुनेश यांच्या छाती आणि पोटात गोळ्या झाडल्या. गोळीबारात मुनेश यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी पती पसार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन मुनेश गोदारा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

दरम्यान, या हत्येनंतर मुनेश गोदारा हिचा भाऊ एसके जाखड यांने अशी माहिती दिली की, ‘मुनेश ही आमच्या लहान बहिणीशी फोनवर बोलत होती. त्याचवेळी तिच्या पतीने तिच्यावर गोळी झाडली. यावेळी तिने फोनवरच बहिणाला सांगितलं की, तिच्या पतीने तिला गोळी मारली आहे. आरोपी सुनीलचे कुटुंब मूळचं चरखी दादरी येथील आहे. सुनील हा एका खासगी कंपनीत पीएसओ म्हणून नोकरी करत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.