पुणे निवासी चिनावलकरांचा स्नेहमेळावा उत्साहात

0

रावेर : पुणे निवासी चिनावलकर यांचा प्रथम स्नेहमेळावा दि ९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तरूण मंडळी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमात प्राध्यापक हेमचंद्र सोनजी भिरूड व चिनावल शाळेचे माजी मुख्याध्यापक बी.टी.बेंडाळे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच लहान मुलांनी गायन व नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी भुषण वायकोळे, भुषण कोल्हे, पंकज कोळंबे, हर्षल पाटील, चंद्रकांत बोंडे, चिराग भंगाळे, राकेश भंगाळे, तुषार कोल्हे, तुषार गाजरे. यांचे विशेष सहकार्य लाभले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सिताराम भारंबे व स्वाती वायकोळे यांनी पार पाडले.

Leave A Reply

Your email address will not be published.