भडगाव शिवसेना व युवा सेनेतर्फे गोर-गरिबांना मोफत जेवण वाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : जगभरासह भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही संक्रमित रुग्ण आढळुन येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्र ही लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे गोर गरिब, हात मजुरी करणारे हताश होवुन त्यांचेवर उपासमारीची वेळ येवुन ठेपलेली आहे. मतदार संघात कोणीही गोर – गरिब, हात मजुरी करणारे उपाशी राहु नये याकरिता पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचे संकल्पनेतुन शिवसेना, युवासेना तर्फे भडगाव शहरात रोज सकाळ व संध्याकाळ एक हजार गरीब – गरजू कुटूंबियांना जेवणाची व्यवस्था करित आहे.

या वेळी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक राजेंद्र पाटील, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, गणेश परदेशी, मनोहर चौधरी, शहर प्रमुख योगेश गंजे, युवा सेना शहरप्रमुख निलेश पाटील, संतोष महाजन, जग्गू भोई, देवा अहिरे, पप्पू महाजन, भडगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.