भडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व जन कल्याण समिती अंतर्गत रक्तदान शिबीर संपन्न

0

भडगाव- प्रतिनिधी : भडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे व जन कल्याण समिती अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या रक्तदान शिबिरासाठी सर्व स्वयंसेवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत ८० सेवकांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन प.पू.बिडकर बाबा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा संघचालक डॉ.निलेश पाटील ,तालुका संघचालक डॉ .प्रफुल पाटील,नाना हाडपे,सोमनाथ पाटील, रवींद्र पाटील, प्रशांत लिंगायत, मयुर पाटील, विकास महाजन, श्याम मुसांडे, दीपक कासार, चेतन कासार, अमोल सोनार, अमोल सोंनजे , सागर पाटील,जन संपर्क अधिकारी दिपक सोनार,जनता बँकेचे मँनेजर स्वप्नील पाटील हे उपस्थित होते रक्तदान शिबिर कार्यक्रमासाठी जन कल्याण समिती ब्लड बँक यांनी मोलाचे योगदान केले तसेच भडगाव जनता बँकेच्या कर्मचारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.