भडगाव मधील 107 नंबर च्या बूथवर होणार पुन्हा मतदान

0

भडगाव :– जळगांव लोकसभा मतदारसंघातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 107 ( जि. प. उर्दू शाळा ,जमादार मोहल्ला, भडगांव ता.भडगांव) येथे दि.२९ रोजी सकाळी 7 वा ते सायं. ६ वाजेपर्यंत फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे सचिव ए. एन. दास यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तरी या मतदान केंद्रावरील मतदार यांनी याची नोंद घ्यावी व वरील दिवशी निर्धारित वेळेत मतदानाचा हक्क बजवावा. असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

23 एप्रिल रोजी मॉकपोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील डाटा क्लिअर न केल्यामुळे मॉकपोलचे 50 मते मशिनमध्येच राहिले. मतदान केंद्राध्यक्ष यांनी नोंदविलेल्या मतांचा हिशोब व मतदान नोंदवही यांच्या तपासणीत मतदार नोंदवहीत 555 मतांची नोंद निघाली. मात्र, क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या तपासणीत 608 मते मतदान यंत्रात निघाली. 53 मतांचा फरक आढळून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.