भडगाव तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक शासन निर्णय ; नागरीकांचे लागले लक्ष

0

भडगाव (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निवडणुक आयोगाने १ जुलै २०२० ते डीसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीस स्थगिती दिली आहे. व अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा शासन निर्णय झाला आहे. भडगाव तालुक्यातही १ जुलै २०२० ते डीसेंबर २०२० या कालावधीत मुदती संपणार्या एकुण ३३ प्रस्तावित ग्रामपंचायतींवर शासनामार्फत प्रशासक नेमण्यात येणार आहे. हा शासन निर्णय झाला आहे. माञ तहसिल निवडणुक प्रशासनास तसे अजुन शासनाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. अशी माहीती भडगाव तहसिल कार्यालयाचे निवासी नायब तहसिलदार रमेश देवकर यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली.

भडगाव तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक 
भडगाव तालुक्यात मुदत संपणार्या या ३३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. यात शिवणी, पिंपळगाव बु, पिंप्रीहाट, आमडदे, भोरटेक बु, सावदे, वडगाव बु, महींदळे, वडगाव नालबंदी, वलवाडी बु, वाक, भट्टगाव, पिचर्ङे, बात्सर, पांढरद, मांडकी, आंचळगाव, कोठली, तांदळवाडी, वाडे, बाळद खु, पळासखेडा, वरखेड, बांबरुड प्र. ब., जुवार्ङी, वडजी, लोण प्र.भ, पिंपरखेड, गिरड, बांबरुड प्र. उ, मळगाव, खेडगाव, बोदर्ङे या ग्रामपंचायतींचा सहभाग आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागला अन कोरोनाच्या पाश्वभुमिवर स्थगितीचा लागला ब्रेक —
भडगाव तालुक्यात १ जुलै २०२० ते डीसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या एकुण ३३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणुक विभागाने लावला होता. या निवडणुक कार्यक्रमासही सुरुवातही चांगली झाली होती. सुरुवातीस ग्रामपंचायतींची जागा आरक्षण निश्चिती, प्रभाग रचना, नमुना ब प्रसिद्ध, प्रभाग रचना हरकतींवर सुनावणी आदि कार्यक्रम निवडणुक विभागाने लावलाही होता. कारण या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या कार्यक्रमास सुरुवातही करण्यात आलेली होती. माञ अचानक कोरोनाचा शिरकाव सर्वञ झाला. कोरोना संकटामुळे व विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हया मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हया ग्रामपंचायतींच्या मतदार यादयाही हयामुळे झालेल्या नाहीत. यापुढे निवडणुक कार्यक्रम लागल्यावरच मतदार यादयाही प्रशासन तयार करता हया ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचाही निर्णय शासनाने नुकताच घेतलेला आहे. माञ तहसिल कार्यालयास अदयापही शासनाचे आदेशाचे पञ प्राप्त झाले नाही. अशी माहीती भङगाव तहसिल विभागाच्या सुञांनी दिली. याकडे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, नागरीकांचे लक्ष लागुन आहे. भङगाव तालूक्यात १ जुलै २०२० ते डीसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या ३३ ग्रामपंचायतींचा यात सहभाग आहे.शासनाने नुकताच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार असल्याचा शासन निर्णय झाला आहे. माञ तहसिल कार्यालयास अदयापही याबाबतचे तसे आदेशाचे पञ वगैरे प्राप्त झाले नाही. रमेश देवकर नायब तहसिलदार कार्यालय भडगाव यांनी दिली.

भडगाव तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक
भडगाव तालुक्यात मुदत संपणार्या या ३३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. यात शिवणी, पिंपळगाव बु, पिंप्रीहाट, आमडदे, भोरटेक बु, सावदे, वडगाव बु, महींदळे, वडगाव नालबंदी, वलवाडी बु, वाक, भट्टगाव, पिचर्ङे, बात्सर, पांढरद, मांडकी, आंचळगाव, कोठली, तांदळवाडी, वाडे, बाळद खु, पळासखेझा, वरखेड, बांबरुड प्र. ब, जुवार्ङी, वडजी, लोण प्र.भ, पिंपरखेड, गिरड, बांबरुड प्र. उ, मळगाव, खेडगाव, बोदर्ङे या ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. अशी माहीती तहसिल निवडणूक विभागाचे लिपिक विनोद माळी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.