बोदवड शहरातील प्रभाग क्रं ५ मधील मटन मार्केट हटवा

0

भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनची नगर पंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

बोदवड (प्रतिनिधी)  – येथील प्रभाग क्रं.५ मधील असलेले मटन मार्केट येथून हटवून येथील नागरिकांचा गंभीर बनलेला आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे नगर पंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना देण्यात आले आहे.

येथील मटन मार्केटमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून विविध आजारांना आमंत्रण दिले जात आहे.याकडे नगर पंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून यामुळे येथे होत असलेल्या घाणीमुळे अनेकांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या अनेक वर्षापासून येथील घाणीमुळे व दुर्गंधीमुळे अनेकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत असून गेल्या काही दिवसांपूर्वी या घाणीमुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली असल्याने काही बालकांचा नाहक बळी गेल्याचा दुदैवी घटना घडल्या आहेत.त्यामुळे येथील हे असलेले मटन मार्केट इतरत्र हटवून येथील आरोग्याचा ऐरणीवर आलेला प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा.

येत्या आठ दिवसांत हा विषय मार्गी न लागल्यास भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला असून निवेदन देताना भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल बाबुराव गंगतिरे व फाउंडेशनचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक,महिला वर्ग उपस्थित होत्या.देण्यात आलेल्या निवेदनाला येथील गावकऱ्यांनी जाहीर पाठिंब्यासह स्वाक्ष-यांचे पत्र देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.