बोदवड शहरातील ‘त्या’ कोरोना बाधित खासगी डॉक्टरवर गुन्हा दाखल

0

बोदवड (प्रतिनीधी) : शहरातील शालिमार टॉकीज मागील परिसरात राहत असलेले डॉ.धीरज शंकरलाल दोधानी वय (४१ )यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते व २५ जूनला त्यांचे स्वँब घेण्यात आला होता. तर २६ रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला.

या कालावधीत २६ ते २७ जून दरम्यान त्यांनी नाडगाव येथे रुग्णांची तपासणी केली होती. त्यामुळे या कोरोना बाधित खाजगी डॉक्टरांच्या संपर्कात आल्याने अनेक रुग्णांचा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने याप्रकरणी तहसीलदार हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित डॉक्टर विरूध्द दि.१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस संजय भोसले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.