अरे बापरे…! जि.प.चा आणखी एका पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

0

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असताना आता जिल्हा परिषदेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. सोबतच जिल्ह्यातील एका पत्रकाराला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जि.प.चे पदाधिकारी देखील पॉझिटिव्ह असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या एक पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर दोन्हीही बरे झालेले असताना आता जिल्हा परिषदेच्या आणखी एका पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.