बोदवड येथील न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माध्यमिक शालांत परिक्षेत उज्ज्वल यश

0

बोदवड (प्रतिनिधी) – येथील दि.बोदवड सार्वजनिक को – ऑफ एज्युकेशन सोसायटी संचलित न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने माध्यमिक शालांत परीक्षेत दरवर्षाची यशाची परंपरा कायम राखली असून सन २०१९ /२०२० च्या परिक्षेत उत्तुंग व घवघवीत यश संपादन केले.शाळेचा निकाल ९०.५६ टक्के लागला.शाळेच्या या दैदिप्यमान निकालात प्रथम क्रमांक कु.भावना ज्ञानेश्‍वर चौधरी(९९.६०) टक्के,व्दितिय क्रमांक कु.आदिती हंसराज पाटील(९६.६० टक्के),तृतीय क्रमांक कु.निर्मिती दीपक चौधरी(९५.२० टक्के ) असे गुण मिळवून मानाचा तुरा रोवला.

तसेचं शेकडा ९० पेक्षा अधिक गुण १३ विद्यार्थ्यांनी मिळवले तर ७५ पेक्षा अधिक गुण ८४ विद्यार्थी,प्रथम श्रेणीत ८८ विद्यार्थी,व्दितीय श्रेणीत ७५ विद्यार्थी असे एकूण २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सर्व यशस्वी गुणवंतांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल,व्हा.चेअरमन अजयजी जैन,सचिव विकास कोटेचा,माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक प्रकाशचंद सुराणा,तसेच सर्व संचालक सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.